State News : शरद पवार आमच्याशी प्रामाणिक, त्यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसरल्याचे एकतरी उदाहरण दाखवा : संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान!
पुणे : शरद पवार आमच्याशी प्रामाणिक आहेत. त्यांनी आजवर कुणाच्या पाठीत खंजीर खुपसलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या पाठीत खुपसण्याचा तर प्रश्नच नाही. त्यांनी असे पाठीत खंजीर खुपसल्याचे एकतरी उदाहरण चंद्रकांत पाटलांनी दाखवावे. मी राजकारणातून संन्यास घेतो, असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.
पाटील आमची सत्ता पाहून तडफडत आहेत. पण ते जेवढे तडफडतील, तितकी त्यांचीच शक्ती क्षीण होईल. महाविकास आघाडीच्या नेत्यांचेही राऊत यांनी कान टोचले. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधकांसारखे वागू नये. मी या नेत्यांबद्दल त्यांच्या वरिष्ठांशी बोलणार आहे. त्यांनी ऐकले तर ठीक नाहीतर शिवसेनेच्या भाषेत त्यांनाही उत्तर देऊ, असा इशाराही राऊत यांनी दिला. खा. राऊत यांनी आज, ५ सप्टेंबरला पुणे शहरातील शिरुर-हवेली येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.