वृद्धाने तीन कुत्र्यांसह स्वत:ला घेतले पेटवून

ठाणे : नैराश्यातून माणूस काय करेल काही सांगता येत नाही. अशीच एक दुर्दैवी घटना बदलापूर शहरात घडली असून तेथे एका ७० वर्षीय वृद्धाने तीन पाळीव कुत्र्यांसह स्वत:ला घरात कोंडून घेतले. एवढ्यावरच न थांबता खोलीला आग लावून दिली. त्यत दोन कुत्र्यांसह वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला. पण एक कुत्रा बचावला. या वृद्धाने नैराश्यातून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले …
 

ठाणे : नैराश्यातून माणूस काय करेल काही सांगता येत नाही. अशीच एक दुर्दैवी घटना बदलापूर शहरात घडली असून तेथे एका ७० वर्षीय वृद्धाने तीन पाळीव कुत्र्यांसह स्वत:ला घरात कोंडून घेतले. एवढ्यावरच न थांबता खोलीला आग लावून दिली. त्यत दोन कुत्र्यांसह वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला. पण एक कुत्रा बचावला. या वृद्धाने नैराश्यातून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बदलापूर पश्चिममध्ये एका मारतीत सत्यप्रित चटर्जी हे वृद्ध व्यक्ती किरायाने राहत होते. त्यांची दोन लग्ने झालेली होती. पण दोन्ही बायका त्यांच्यासोबत राहत नव्हत्या. त्यामुळे ते एकटेच राहत होते.दोन दिवसांपूर्वी सायंकाळी पाचच्या सुमारास ते राहत असलेल्या खोलीतून अचानक धुराचे लोळ बाहेर पडलेले दिसले. शेजार्‍यांनी फोन करून पोलीस व अग्निशमन दलाला पाचारण केले. पथकाने दरवाजा तोडून पहिले असता चटर्जी यांनी खोली आतून बंद करून त्यासमोर लोखंडी कपाट आडवे लावले होते. खोलीत तीन कुत्र्यांसह त्यांनी स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. पैकी एक कुत्रे बचावले. पण दोन कुत्रे आणि चटर्जी यांचा होरपळून मृत्यू झाला. प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.