वाचावीच अशी लव्हस्टोरी… दोन्ही हात नसतानाही प्राचीने घेतला त्याच्याशी लग्नाचा निर्णय; तीन वर्षांपासून होते प्रेमसंबंध!

पुणे ः प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं… ही मंगेश पाडगावकरांची कविता प्रसिद्ध आहे. मात्र ही लव्हस्टोरी वाचून प्रेम म्हणजे प्रेम असलं तरी ते प्रत्येकाचं सेम नसतं असंच तुम्हालाही वाटेल. जन्मतःच ज्या तरुणाला दोन्ही हात नाहीत अशा तरुणावर कुणी प्रेम करेल का? तुमचे उत्तर नाही असेच असले तरी तसं घडलंय. केवळ प्रेमच नाही …
 
वाचावीच अशी लव्हस्टोरी… दोन्ही हात नसतानाही प्राचीने घेतला त्याच्याशी लग्नाचा निर्णय; तीन वर्षांपासून होते प्रेमसंबंध!

पुणे ः प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं… ही मंगेश पाडगावकरांची कविता प्रसिद्ध आहे. मात्र ही लव्हस्टोरी वाचून प्रेम म्हणजे प्रेम असलं तरी ते प्रत्येकाचं सेम नसतं असंच तुम्हालाही वाटेल. जन्मतःच ज्या तरुणाला दोन्ही हात नाहीत अशा तरुणावर कुणी प्रेम करेल का? तुमचे उत्तर नाही असेच असले तरी तसं घडलंय. केवळ प्रेमच नाही तर तिने त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेत नोंदणी पद्धतीने लग्नदेखील केले आहे.

ऋषिकेश हा फलटण तालुक्यातील दुधेबावी गावचा तर प्राची त्याच तालुक्यातील सांगवी येथे राहणारी. ऋषी जन्मापासूनच दिव्यांग. त्याला दोन्ही हात नाहीत. मात्र यावर मात करून ऋषीने पायाने पेपर लिहून १० व्या वर्गात ९० टक्के गुण मिळविले. पायाने तो चांगले चित्र काढतो. ऋषीला गायनाचा सुद्धा छंद आहे. तीन अल्बमची सुद्धा त्याने निर्मिती केली आहे. प्राची आणि ऋषी फलटणमध्ये एकाच कॉलेजमध्ये शिकतात. प्राचीला सुद्धा गायनाचा छंद आहे. त्यातून एकमेकांची जवळीक आणि प्रेम वाढले. तीन वर्षे दोघांची प्रेम कहाणी बहरत होती. प्राचीने ऋषीसोबत लग्नाचा निर्णय घेतला. प्राचीच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला मात्र विरोधाला न जुमानता प्राची तिच्या निर्णयावर ठाम होती. नुकताच दोघांचाही नोंदणी पद्धतीने विवाह झाला. जीवनसाथी काय करतो, त्याचा पगार आणि उत्‍पन्न यापेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी ऋषीच्या कर्तृत्व आणि गुणांच्या प्रेमात पडले, असे प्राची सांगते.