लॉकडाऊनमुळे नोकरी गेली,नैराश्यातून इंजिनिअरने घेतला गळफास
पुणे : कोरोनापश्चात स्थिती व लॉकडाऊनमुळे अनेकांच्या आयुष्याची परवड होत आहे. पुण्यात लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्या एका इंजिनिअर तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केली.
ऋषिकेश मारुती उमाप असे या २९वर्षीय तरुणाचे नाव असून तो कोंढवा भागात कावेरी पार्क सोसायटीत आई-वडिलांसोबत राहत होता.सोमवारी रा़त्री तो नेहमीप्रमाणे झोपला. पण सकाळी उशीर झाला तरी तो उठला नाही. कुटुंबियांनी पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. ऋषिकेश हा एका कंपनीत इंजिनिअर होता. पण लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडल्याने त्याची नोकरी गेली होती. त्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून घरीच होता. त्यातून त्याला नैराश्य आले होते. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.कुटुंबियांनी याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.पण तेथे कुठलीही सुसाईड नोट आढळून आली नाही, असे पोलिसांनी सांगितले.