लग्नाची बोलणी करण्यासाठी घेऊन गेले… नंतर केला खून!

कल्याण ः बहिणीशी प्रेमसंबंध असलेल्या तरुणाला लग्नाची बोलणी करण्यासाठी घेऊन जाऊन नंतर मित्राच्या मदतीने त्याचा काटा काढल्याची घटना भिवंडीजवळ घडली. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छीन होता. हत्येचा छडा लावणं सोपं नव्हतं; परंतु ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या प्रकरणाचा छडा लावला. तरुणाच्या खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. त्यातील एकाच्या बहिणीसोबत तरुणाचे …
 

कल्याण ः बहिणीशी प्रेमसंबंध असलेल्या तरुणाला लग्नाची बोलणी करण्यासाठी घेऊन जाऊन नंतर मित्राच्या मदतीने त्याचा काटा काढल्याची घटना भिवंडीजवळ घडली.

हत्या करण्यात आलेल्या तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छीन होता. हत्येचा छडा लावणं सोपं नव्हतं; परंतु ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या प्रकरणाचा छडा लावला. तरुणाच्या खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. त्यातील एकाच्या बहिणीसोबत तरुणाचे प्रेमसंबंध होते. यातूनच हे हत्याकांड झाले. भिवंडी तालुक्यातील सापेगावात एका तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाची गळा कापून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह चारीमध्ये ढकलून देण्यात आला. आरोपींनी पुरावा नष्ट केला.

ग्रामीण पोलिसांची वेगवेगळी पथके गुन्ह्याचा तपास करत होती. स्थानिक गुन्हे शाखाही स्वतंत्र तपास करत होती. मृतदेह कुजलेला ओळख पटवणे अवघड होते. अखेर मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आले. हत्या झालेला तरुण दिलीपकुमार पाल असल्याचं स्पष्ट झालं. कोणताही धागादोरा नसताना पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. उल्हासनगरमधील २४ वर्षांच्या तरुणासह डोंबिवलीतील एका ४६ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले. उल्हासनगरच्या तरुणाच्या बहिणीसोबत पाल याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे दुसऱ्या आरोपीच्या मदतीने हा खून करण्यात आला. लग्नाची बोलणी करण्यासाठी दुचाकीवरून पाल याला नेऊन त्याची हत्या करण्यात आली.