राष्ट्रवादीच्या “या’ नेत्याची साडेतीनशे कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चार कोटी वीस लाखांची नव्हे, तर साडेतीनशे कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मालमत्ता खरेदी केली, तेव्हा तिची किंमत चार कोटी वीस लाख होती आणि आताच्या बाजारभावाने ती साडेतीनशे कोटी रुपये झाली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांची खंडणी …
Jul 18, 2021, 10:47 IST
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चार कोटी वीस लाखांची नव्हे, तर साडेतीनशे कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मालमत्ता खरेदी केली, तेव्हा तिची किंमत चार कोटी वीस लाख होती आणि आताच्या बाजारभावाने ती साडेतीनशे कोटी रुपये झाली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांची खंडणी वसुलीचा आरोप केला होता. देशमुख यांची सीबीआय आणि ईडी एकाच वेशळी चाैकशी करीत आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणात देशमुख, त्यांच्या पत्नी आरती आणि मुलगा सलील यांची चाैकशी सुरू आहे. त्यांना ईडीने चौकशीसाठी नोटिसा बजावल्या असल्या, तरी अजून या तिघापैकी एकही जण प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहिलेला नाही.