राज्‍याची बातमी ः नवरा सतत चारित्र्यावर संशय घ्यायचा; पत्नीने त्‍याचा काटाच काढला!

सांगली : सतत चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची त्याच्या पत्नीने चाकूने भोसकून व दगडाने ठेचून हत्या केली. ही खळबळजनक घटना सांगली जिल्ह्यातील गोमेवाडी येथे ३० सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. श्रीकांत श्रीपती खरात (४७) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे तर वैशाली श्रीकांत खरात असे आरोपी पत्नीचे नाव आहे. सुखात …
 
राज्‍याची बातमी ः नवरा सतत चारित्र्यावर संशय घ्यायचा; पत्नीने त्‍याचा काटाच काढला!

सांगली : सतत चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची त्याच्या पत्नीने चाकूने भोसकून व दगडाने ठेचून हत्या केली. ही खळबळजनक घटना सांगली जिल्ह्यातील गोमेवाडी येथे ३० सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

श्रीकांत श्रीपती खरात (४७) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे तर वैशाली श्रीकांत खरात असे आरोपी पत्नीचे नाव आहे. सुखात सुरू असलेल्या श्रीकांत आणि वैशालीच्या संसाराला नजर लागली आणि ५ वर्षांपासून तो सतत वैशालीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला लागला. पत्नीचे बाहेरच्या पुरुषाशी संबंध आहेत, असा आरोप श्रीकांत नेहमी करायचा. त्यामुळे दोघा पती- पत्नीत नेहमी वाद व्हायचे. ३० सप्टेंबरला दुपारी दोघांत वाद झाला. आधी श्रीकांतने वैशालीच्या पायावर चाकूने वार केले.

यात वैशाली जखमी झाली. तेव्हा संतापलेल्या वैशालीने श्रीकांतच्या हातातील चाकू हिसकला व त्याच्या गळ्यावर वार केले व पोटात खुपसला. त्यानंतर वैशालीने दगडाने ठेचून श्रीकांतची हत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रीकांतचा खून करणाऱ्या आरोपी वैशालीला आटपाडी (जि. सांगली) पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यातील चाकू व दगड जप्त केले आहेत.