राज ठाकरे कॅमेरामनला म्हणाले, “मी काय राज कुंद्रा आहे?’
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले आहेत. राज हे सडेतोड, मिश्कील आणि बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कार्यकर्त्यांच्या भेठीगाठी घेत असताना एक कॅमेरामन त्याचे चित्रीकरण करीत होता, त्या वेळी “राज यांनी मी काय राज कुंद्रा आहे का? ‘ अशी विचारणा केल्याने अगोदर उपस्थित अचंबित झाले आणि नंतर हास्यकल्लोळात बुडाले.
राज यांच्या या टिप्पणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राज मनसेच्या पुणे कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. ते मनसेच्या पुणे कार्यालयात दाखल झाल्यानंतर कॅमेरामननी त्यांना गराडा घातला. राज ठाकरे सोफ्यावर बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. काही अर्ज-विनंत्या पाहत होते. त्यावेळी कॅमेरामन देखील त्यांचे शूटिंग करत होते. हे राज ठाकरे यांच्या लक्षात आले. बराचवेळ कॅमेरामन शूटिंग करत आहेत हे पाहिल्यावर त्यांनी कॅमेरामनना हटकले. तरीही कॅमेरामन ऐकेनात. ते शूटिंग करीत होते; मात्र कॅमेरामनांवर न रागावता ते त्यांच्याकडे पाहून हसले. “माझं कान, नाक सगळं शूट करून झालं का?… किती वेळ तेच तेच शूटिंग करता? मी काय कुंद्रा आहे का?… असा खास शैलीतील “राजटोला’ त्यांनी लगावला. त्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.