यूट्यूबवर डेमो पाहून जावयाची सासरवाडीत आत्महत्या
बेरोजगारी व कौटुंबिक वादातून नैराश्य आल्याने कृत्यू
औरंगाबाद : येथील एका २६ वर्षीय तरुणाने यू-ट्यूबवर प्रात्यक्षिक पाहून सासरवाडीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.पोलिसांनी सांगितले की, हिमायतबाग परिसरातील भीमराजनगरात राहणार्या सचिन प्रकाश अहिरे (वय २६, रा. आनंदवडी,जैतवन कॉलनी ठाणे) याचा विवाह अशोक खरात यांच्या मुलीसोबत झाला होता.सचिन हा मुंबईत एका शोरूममध्ये कामाला होता. पण लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली होती. त्यानंतर तो सासरवाडीत आला होता. मंगळवारी त्याने त्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन अहिरे हा नोकरी गेल्याने निराश होता. पत्नीसोबत कौटुंबिक वादही सुरू होता. त्यातून त्याने आत्महत्या केली. त्याआधी त्याने मोबाईलवर यू-टयूब चॅनेलवर आत्महत्या कशी करावी याचा डेमो पाहिला होता, अशी माहिती पत्नीने पोलिसांना दिली.