मुख्यमंत्री म्हणाले, जुने व्हायरस परत आले, त्यांचा बंदोबस्त करायचाय…
मुंबई : जुने व्हायरस परत आले आहेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय… असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की कोरोनालाच उद्देशून म्हणाले की नारायण राणेंना यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. निमित्त ठरले ते उद्योगविषयक संमेलनातील त्यांचा सहभाग. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर दोन राजकीय राडा झाला. राणेंना अटक, शिवसेना-भाजपाची आंदोलन यामुळे वातावरण पेटले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणतीच …
Aug 26, 2021, 16:36 IST
मुंबई : जुने व्हायरस परत आले आहेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय… असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की कोरोनालाच उद्देशून म्हणाले की नारायण राणेंना यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. निमित्त ठरले ते उद्योगविषयक संमेलनातील त्यांचा सहभाग.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर दोन राजकीय राडा झाला. राणेंना अटक, शिवसेना-भाजपाची आंदोलन यामुळे वातावरण पेटले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर आज कोरोनावरून ते जे बोलले, त्यावरून पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. काही जुने व्हायरस परत आले आहेत. ते वेगवेगळे साइड इफेक्ट्स पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करायचाय, असे ते म्हणाले. नामोल्लेख टाळल्याने ते कोरोनाबद्दलच बोलले की राणेंकडे रोख होता हे कळायला मार्ग नाही.