मित्रानेच केला घात!; 15 वर्षीय मुलीला फिरण्याच्‍या बहाण्याने नेऊन केला बलात्‍कार; औरंगाबादची घटना

औरंगाबाद (संभाजीनगर लाइव्ह वृत्तसेवा) ः मित्रानेच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ही घटना औरंगाबाद शहराजवळील वाळूज परिसरातील खवड्या डोंगर परिसराच्या निर्जनस्थळी घडली. तिला गप्पा मारण्याच्या बहाण्याने तो खवड्या डोंगर परिसरात दुचाकीवरून घेऊन गेला. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरी केली. वाळूज एमआयडीसी पोलीसांनी आरोपीवर बलात्कार, अपहरण आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सोमेश भिकुलाल मुंगसे …
 

औरंगाबाद (संभाजीनगर लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मित्रानेच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ही घटना औरंगाबाद शहराजवळील वाळूज परिसरातील खवड्या डोंगर परिसराच्‍या निर्जनस्थळी घडली. तिला गप्पा मारण्याच्या बहाण्याने तो खवड्या डोंगर परिसरात दुचाकीवरून घेऊन गेला. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरी केली. वाळूज एमआयडीसी पोलीसांनी आरोपीवर बलात्कार, अपहरण आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सोमेश भिकुलाल मुंगसे (22, रा. तिसगाव, ता. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याने काही दिवसांपूर्वीच मुलीसोबत मैत्री केली होती. विश्वास संपादन केल्यानंतर 4 जून रोजी तिला गप्पा मारण्याचा बहाण्याने खवड्या डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेला. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदवला होता. बलात्कारानंतर पीडितेला त्‍याने स्वतःच्या घरी नेलं. मुलीचे आई- वडील बाहेरगावी गेले असून, तिला आजची रात्र आपल्या घरात राहू द्या, अशी विनंती आरोपीने आपल्या आई-वडिलांना केली. त्यामुळे त्‍यांनी तिला घरात रात्रीसाठी ठेवून घेतले होते.

दुसऱ्या दिवशी आरोपीने तिला सिडको येथील एका उद्यानासमोर सोडून दिले व पळून गेला. घाबरलेल्या मुलीला पाहून नागरिकांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विश्वासाने चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. 6 जून रोजी रात्री उशीरा आरोपी तरुणाला औद्योगिक परिसरातून अटक करण्यात आला आहे. 7 जून रोजी त्‍याला न्यायालयात हजर केले असता 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.