महाराष्ट्रात भाडेकरू कायद्याला शिवसेनेचा विरोध
मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्राच्या आदर्श भाडेकरू कायद्याला राज्यात आडकाठी आली आहे. हा कायदा भाडेकरूंसाठी धोक्याचा तर मालकांच्या हिताचा असल्याचा आरोप करत सत्ताधारी शिवसेनेने विरोध केला आहे. हा विषय पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारित असून, केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये, असेही सेनेने म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेने ही मागणी केली आहे. राज्यात बॉम्बे …
Jun 9, 2021, 21:35 IST
मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्राच्या आदर्श भाडेकरू कायद्याला राज्यात आडकाठी आली आहे. हा कायदा भाडेकरूंसाठी धोक्याचा तर मालकांच्या हिताचा असल्याचा आरोप करत सत्ताधारी शिवसेनेने विरोध केला आहे. हा विषय पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारित असून, केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये, असेही सेनेने म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेने ही मागणी केली आहे. राज्यात बॉम्बे रेंट अॅक्ट आणि महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा सक्षम आणि परिपूर्ण आहे. भाडेकरूंसाठी बनलेल्या कायद्यात भाडेकरूला संरक्षण दिले जाते. रेंट अॅक्ट हा भाडेकरूधार्जिणा असला पाहिजे आणि केंद्राचा प्रस्तावित कायदा त्याउलट आहे, असे सेनेने म्हटले आहे.