मला नवरा पसंत नाही, दुसऱ्याच मुलावर आहे प्रेम… भर लग्‍नात पोलिसांना बोलावून वधूने मोडले लग्‍न!

नागपूर ः हल्लीच्या तरुण- तरुणींची मानसिकता बदलली आहे. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार हवा असतो. पसंत नसलेल्या व्यक्तीशी संसारगाठ बांधायला आता कुणीच तयार नसतं. मनाविरुद्ध होणारं लग्न मोडून काढण्याचा प्रयत्न अनेक मार्गांनी होत असतो; परंतु नागपूरच्या तरुणीनं अगदी बोहल्यावर चढता चढता ते मोडण्यासाठी पोलिसांची मदत घेतली. नागपूर जिल्ह्यातील एका मुलीचं लग्न तिच्या कुटुंबियांनी तिच्या मनाविरुद्ध ठरवलं. …
 

नागपूर ः हल्लीच्या तरुण- तरुणींची मानसिकता बदलली आहे. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार हवा असतो. पसंत नसलेल्या व्‍यक्तीशी संसारगाठ बांधायला आता कुणीच तयार नसतं. मनाविरुद्ध होणारं लग्न मोडून काढण्याचा प्रयत्न अनेक मार्गांनी होत असतो; परंतु नागपूरच्या तरुणीनं अगदी बोहल्यावर चढता चढता ते मोडण्यासाठी पोलिसांची मदत घेतली.

नागपूर जिल्ह्यातील एका मुलीचं लग्न तिच्या कुटुंबियांनी तिच्या मनाविरुद्ध ठरवलं. तिला मान्य नसताना जबरदस्तीनं विवाह केला जाणार होता. मुलीने त्याअगोदर विवाह रद्द करण्याचे केलेले प्रयत्न फोल ठरले. शेवटी या मुलीकडे कोणताही पर्याय राहिला नाही. त्यामुळं तिनं बोहल्यावर उभं राहण्याची मानसिकता तयार केली. हा विवाह रामटेकजवळील एका रिसॉर्टमध्ये होणार होता. अचानक त्या मुलीला काही तरी सुचलं. तिनं लग्नात पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. मुलीच्या फोननंतर पोलिस रिसोर्टमध्ये दाखल झाले. पोलिसांना पाहून वधू-वराकडील मंडळीही आश्चर्यचकित झाली. मुलीनं तिथंच नवरा आपल्याला आवडत नाही. आपलं दुसऱ्याच तरुणावर प्रेम आहे, असं सांगितलं. त्यामुळं वराकडची मंडळी संतप्त झाली. पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी मध्यस्थी केली. वाद मिटवला. दोन्ही कुटुंबातील लोकांच्या संमतीनं लग्न रद्द झालं.