बायको दुसर्यासोबत पळून गेली म्हणून त्याने 18 महिलांसोबत शरीरसंबंध बनवून केली हत्या!
हैदराबाद (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः बायको दुसर्या पुरुषासोबत पळून गेल्याने त्याला समस्त महिला जातीबद्दलच चीड निर्माण झाली आणि ही चीड इतकी वाढली की त्याने महिलांची हत्याच करायला सुरुवात केली. मात्र हत्या करण्याआधी तो त्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवायचा. अशा प्रकारे त्याने 18 महिलांची हत्या केली. तेलंगणातील हैदराबादमध्ये पोलिसांनी अटक केलेल्या सीरियल किलरची ही अंगावर शहारे आणणारी कहानी आहे.
दोन महिलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर या मारेकर्याने आणखी 16 महिलांची हत्या केल्याची कबुली दिली. आज पत्रपरिषद घेऊन पोलिसांनी या भयंकर प्रकाराची माहिती दिली. 30 डिसेंबर 2020 रोजी घाटकेसर येथील अंकुशपुरमध्ये वेंकटगिरी येथील 50 वर्षीय महिलेची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात बोरबंडा येथील 45 वर्षीय रामुलू याला अटक केली होती. त्याच्यावर मूलगुणच्या बालगुमध्ये 35 वर्षीय महिलेची हत्या केल्याचाही आरोप आहे. तिचा मृतदेह 10 डिसेंबरला सिद्दीपेट येथे आढळून आला होता.
2003 पासून महिलांना करायला लक्ष्य
रामुलूचे लग्न 21 व्या वयात झाले होते. त्याची पत्नी परपुरुषासोबत पळून गेली होती. 2003 पासून त्याने महिलांना टार्गेट केले. तो शारीरिक संबंधांसाठी महिलांना पैसे देऊन बोलवायचा. नंतर हत्या करायचा.