बाप रे बापऽऽ… एकाच गावातील सहा जणांना चावला साप..!; एकाचा मृत्यू, वाशिम जिल्ह्यातील घटना

वाशिम ः एकाच गावातील सहा जणांना विषारी सापाने चावा घेतल्याची खळबळजनक घटना मेडशी (जि. वाशिम) येथे काल, १८ ऑगस्टला समोर आली. सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून, पाच महिला मृत्यूशी झुंज देत आहेत. मेडशी गावात पंजाबबाबा नावाच्या साधूचे ठिकाण आहे. पंचक्रोशीत बाबांचा लौकिक आहे. दर गुरुवारी शेकडो भक्त बाबांच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. १७ ऑगस्टच्या …
 
बाप रे बापऽऽ… एकाच गावातील सहा जणांना चावला साप..!; एकाचा मृत्यू, वाशिम जिल्ह्यातील घटना

वाशिम ः एकाच गावातील सहा जणांना विषारी सापाने चावा घेतल्याची खळबळजनक घटना मेडशी (जि. वाशिम) येथे काल, १८ ऑगस्टला समोर आली. सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून, पाच महिला मृत्यूशी झुंज देत आहेत.

मेडशी गावात पंजाबबाबा नावाच्या साधूचे ठिकाण आहे. पंचक्रोशीत बाबांचा लौकिक आहे. दर गुरुवारी शेकडो भक्त बाबांच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. १७ ऑगस्टच्या रात्री पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू होता. मध्यरात्री बाबांना विषारी सापाने चावा घेतला. पहाटेच्या सुमारास त्यांची तब्येत एकाएकी बिघडल्याने त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात येत होते. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. बाबांच्या मृत्यूची बातमी येईपर्यंत याच परिसरातील आणखी ५ महिलांना सुद्धा सर्पदंश झाल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.