बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी चिंचवड : बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करण्यात निगडी पोलिसांना यश आले आहे. या रॅकेटचे धागेदोरे मध्यप्रदेश, गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा तयार करणारी दोन स्वतंत्र रॅकेट एकाच वेळी उघडकीस आली. पिंपरी आणि रावेर पोलिसांनी ही कारवाई केली.पिंपरी चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा तयार …
 

पिंपरी चिंचवड : बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करण्यात निगडी पोलिसांना यश आले आहे. या रॅकेटचे धागेदोरे मध्यप्रदेश, गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा तयार करणारी दोन स्वतंत्र रॅकेट एकाच वेळी उघडकीस आली. पिंपरी आणि रावेर पोलिसांनी ही कारवाई केली.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात कारवाई करत पिंपरी चिंचवडमधील निगडी पोलिसांनी 32 लाख 67 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या, तर मध्य प्रदेशातील बनावट नोट प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील रावेरमधून चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. निगडी परिसरातील ओटास्कीम येथून सुरू झालेली कारवाई पंढरपूर, सातारा, मुंबईमार्गे गुजरातपर्यंत गेली. महाराष्ट्रा आणि गुजरातमधून प्रत्येकी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. रावेरमधील चार जणांचा त्यात समावेश केला, तर बनावट नोटा प्रकरणात दहा जणांना बेड्या पडल्या आहेत. गोरख दत्तात्रय पवार, विठ्ठल गजानन शेवाळे, जितेंद्र रंकनीधी पाणीग्रही, राजू उर्फ रणजीत सिंह खतुबा परमार, जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल, किरण कुमार कांतीलाल पटेल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.