फेसबुक मैत्रीतून सेक्सपर्यंत गेली गोष्ट… तिने रिलेशन थांबविण्याचे सांगताच पतीला गेला मेसेज…!; औरंगाबादची घटना
औरंगाबाद (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा)ः विवाहित तरुणीसोबत फेसबुकवर मैत्री झाली. ओळख वाढली. घरी येणे -जाणे सुरू झाले. ओळखीचे रूपांतर सेक्स करण्यात झाले. मात्र मागील काही दिवसांपासून तिने त्याला टाळणे सुरू केले. अनेकवेळा भेटायला बोलावूनही तिने घराबाहेर पडण्यास नकार देत असल्याने त्याने थेट तिच्या पतीलाच मेसेज पाठवला. प्रकरण हाताबाहेर गेल्याने तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात ही घटना 6 मार्चला समोर आली.
प्रतीक ऊर्फ रिक्की पाटील (रा.मालेगाव, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. २०१९ मध्ये प्रतीकने औरंगाबाद शहरात राहणाऱ्या एका विवाहित तरुणीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तो माहेरचा असल्याने तिने ही रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर प्रतीकने सतत मेसेज पाठवून जवळीक निर्माण केली. सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर झाल्या, २०१९ ते ६ मार्च २०२१ या कालावधीत तो तरुणीच्या चार वेळा घरीही आला. यावेळी त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. मात्र नंतर तिने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने त्याने तिच्या पतीला व नातेवाइकांना फोन, मेसेज करून तिची बदनामी केली. सतत होणाऱ्या बदनामीला कंटाळून पीडितेने सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. यावरून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.