पोलीस इन्स्पेक्टरनेच केला महिला पोलिसावर बलात्कार, वाशिम येथील घटना
वाशिम (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा) ः ओळखीचा फायदा उचलून महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जात पोलीस निरिक्षकाने बलात्कार केला. त्यानंतर मारहाणही केली, असा आरोप पीडितेने केला आहे. ही घटना वाशिममध्ये समोर आली असून, शहर पोलीस ठाण्यात विश्वकांत गुट्टे या पोलीस निरिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्यात गुट्टे हा 2007 मध्ये पीएसआय …
Jun 7, 2021, 11:31 IST
वाशिम (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा) ः ओळखीचा फायदा उचलून महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जात पोलीस निरिक्षकाने बलात्कार केला. त्यानंतर मारहाणही केली, असा आरोप पीडितेने केला आहे. ही घटना वाशिममध्ये समोर आली असून, शहर पोलीस ठाण्यात विश्वकांत गुट्टे या पोलीस निरिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्यात गुट्टे हा 2007 मध्ये पीएसआय होता. यावेळी त्याची ओळख पीडित पोलीस महिलेशी झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत 30 मे 2021 रोजी वाशिममध्ये गुट्टे हा तिच्या घरी गेला. तिच्यावर बलात्कार करून मारहाण केली. सध्या गुट्टे हा नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आहे.