पोटात दुखू लागल्याने शरद पवार रुग्णालयात; परवा शस्‍त्रक्रिया

काळजी न करण्याचे नवाब मलिक यांचे आवाहन मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची तब्येत रविवारी रात्री अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवार यांना पोटदुखीचा असह्य त्रास सुरू झाला आहे. पवारांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.तपासणीनंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास …
 

काळजी न करण्याचे नवाब मलिक यांचे आवाहन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची तब्येत रविवारी रात्री अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवार यांना पोटदुखीचा असह्य त्रास सुरू झाला आहे. पवारांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.तपासणीनंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याआधी मंगळवारी त्यांची अँडीस्कोपी करण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.पवार यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही मलिक यांनी केले आहे. शिवाय पवार पुढीलआठवड़यात पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसचा प्रचार करणार होते. परंतु पवार यांची तब्येत बिघडल्याने त्यांचे नजिकच्या काळातील सर्व दौरे, कार्यक्रम रद़द करण्यात आले आहेत. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. या गुप्त भेटीची देशभर चर्चा सुरू आहे.