पुण्यात पोलिसांनी उधळली डान्स पार्टी; डाॅक्टर फरार

पुणेः पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याशी रेव्ह पार्ट्या आणि डान्स पार्ट्या वारंवार होतात. अशीच एक पार्टी गोळेवाडीतील एका रिसॉर्टमध्ये सुरू होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ती पार्टी उधळून लावली. पोलिसांच्या पथकाने हाॅटेल मालकासह दहा जणांना अटक केली. त्यात सहा पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. या पार्टीत सहभागी झालेला एका डाॅक्टर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. दक्षिण …
 

पुणेः पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याशी रेव्ह पार्ट्या आणि डान्स पार्ट्या वारंवार होतात. अशीच एक पार्टी गोळेवाडीतील एका रिसॉर्टमध्ये सुरू होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ती पार्टी उधळून लावली.

पोलिसांच्या पथकाने हाॅटेल मालकासह दहा जणांना अटक केली. त्यात सहा पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. या पार्टीत सहभागी झालेला एका डाॅक्टर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. दक्षिण पुण्यातील आंबेगावच्या भाकरे मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलमधील डॉ. निखील भाकरे याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. पोलिसांनी विनय सुभाष कांबळे, संदीप शंकर कोतवाल, सचिन विठ्ठल शिंदे, कालिदास शशिराव काकडे, विठ्ठल विजय मोरे, राजेश बलभीम वाघमारे यांच्यासह चार महिलांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. साउंड सिस्टीमवर गाणी लावून लोक नाचत होते. तिथे उपस्थित असलेल्या कुणीही मास्क लावला नव्हता. गोळेवाडी येथील सान्वी रिसॉर्टमध्ये डान्स पार्टी सुरू होती. डॉ. भाकरे हाच या पार्टीचा संयोजक होता.