पत्नी माघारी काय करते, कुणाशी बोलते… जाणून घेण्यासाठी पतीकडून हेरगिरी!; लक्षात आल्यावर तिने गाठले पोलीस ठाणे!!

पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पत्नी काय करते, कुणाशी बोलते हे जाणून घेण्यासाठी नवरोबाने हायटेक शक्कल लढवली. मात्र तब्बल ८ वर्षांनंतर पतीचा कारनामा लक्षात आल्याने पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुणे शहरात हा प्रकार उघडकीस आला आहे. ३३ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती नेहमी तिच्यावर संशय घ्यायचा. …
 
पत्नी माघारी काय करते, कुणाशी बोलते… जाणून घेण्यासाठी पतीकडून हेरगिरी!; लक्षात आल्यावर तिने गाठले पोलीस ठाणे!!

पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पत्नी काय करते, कुणाशी बोलते हे जाणून घेण्यासाठी नवरोबाने हायटेक शक्कल लढवली. मात्र तब्बल ८ वर्षांनंतर पतीचा कारनामा लक्षात आल्याने पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुणे शहरात हा प्रकार उघडकीस आला आहे.

३३ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती नेहमी तिच्यावर संशय घ्यायचा. तिच्यासोबत वेगवेगळ्या कारणावरून वाद घालायचा. पत्नी माघारी काय करते हे जाणून घेण्यासाठी त्याने युक्ती केली. पत्नीला मोबाइल गिफ्ट दिला. पत्नीच्या नकळत मोबाइलमध्ये स्पाय अँड रेकॉर्डर हे ॲप डाऊनलोड केले. यामुळे पत्नी काय करते, कुणाशी बोलते याची माहिती पतीला मिळायची. हा डेटा लॅपटॉपमध्ये घेऊन पती त्याचा गैरवापर करायचा, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.