पटोले यांच्याविरोधात अजितदादांचा मुख्यमंत्र्यांकडे संताप

मुंबई ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा केलेला आरोप राज्य सरकारच्या स्थैर्याला सुरुंग लावणारा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांच्याविषयी संताप व्यक्त केला असून, मुख्यमंत्र्यांशी बोलताना आरोप फेटाळून लावले आहेत. महाविकास आघाडीतील नेते जरी विसंवाद आणि मतभेद असल्याचे नाकारत असले, तरी पटोले यांची गेल्या काही दिवसांतील वक्तव्ये राज्य सरकार अस्थिर …
 

मुंबई ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा केलेला आरोप राज्य सरकारच्या स्थैर्याला सुरुंग लावणारा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांच्याविषयी संताप व्यक्त केला असून, मुख्यमंत्र्यांशी बोलताना आरोप फेटाळून लावले आहेत.

महाविकास आघाडीतील नेते जरी विसंवाद आणि मतभेद असल्याचे नाकारत असले, तरी पटोले यांची गेल्या काही दिवसांतील वक्तव्ये राज्य सरकार अस्थिर करणारी आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही टार्गेट करणारी पटोले यांची वक्तव्ये जिव्हारी लागल्याने आता अजितदादा चांगलेच संतापले आहेत. ठाकरे यांच्यावरही आता थेट आरोप झाल्याने एरव्ही संयमी असलेले ठाकरेही आता संतप्त झाले आहेत. पटोले कुणाची सुपारी घेऊन काम करतात का, असा सवाल आता आघाडीतील काही नेतेही करायला लागले आहेत. सरकार चालवायची जबाबदारी तीनही पक्षांची असताना पटोले, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सरकारच्या अडचणी वाढवित आहेत. पटोले यांच्याविरोधात ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याकडे थेट तक्रार करूनही पटोले सातत्याने सरकारवर तुटून पडत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनाच आता या प्रश्नी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे कान टोचावे लागतील, असे दिसते.