पंतप्रधानांनी झापले असते, तर तुमच्यापुढं उभी असते का?

मुंबई ः खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद नाकारल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्याचे सत्र अजूनही सुरू ठेवले आहे. दरम्यानच्या काळात पंकजा मुंडे यांनी दिल्लीत हजेरी लावली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांना मोदी यांनी झापल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याबाबत नाराजी व्यक्त करताना मोदी यांनी झापले असते तर मी तुमच्यापुढे उभी राहिली असते का, असा …
 

मुंबई ः खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद नाकारल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्याचे सत्र अजूनही सुरू ठेवले आहे. दरम्यानच्या काळात पंकजा मुंडे यांनी दिल्लीत हजेरी लावली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांना मोदी यांनी झापल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याबाबत नाराजी व्यक्त करताना मोदी यांनी झापले असते तर मी तुमच्यापुढे उभी राहिली असते का, असा थेट सवाल समर्थकांना केला.

समर्थकांच्या नाराजीनंतर मुंडे यांनी वरळीत पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मोदी यांच्यांशी घेतलेल्या भेटीनंतर साधलेल्या या संवादाला महत्व आले होते. आपली भूमिका स्पष्ट करताना, ‘मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणाचेही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही,’ असं सांगतानाच त्यांनी सर्व समर्थकांनी दिलेले राजीनामे फेटाळून लावले. असे असले, तरी ज्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे राजीनामे दिले, त्यांचे काय, हा प्रश्न उरतोच. पंकजा मुंडे यांनी आज वरळीत पक्ष व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच दिल्लीत नेमकं काय घडलं याचीही माहिती दिली. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मी असुरक्षित नाही. मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करत आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. या वेळी पंकजा यांनी आपण दबावतंत्र करत नसल्याचे स्पष्ट केले. मला दबाव तंत्र करायचे असेल तर ही ती जागा नाही. ही जागा पुरणार नाही. त्यासाठी वेगळी जागा लागेल, असा गर्भित इशाराही दिला.