पंढरपूरचा विठ्ठल कुणाला पावणार? भाजपच्या अवताडेंनी घेतली आघाडी
पंढरपूर : पंढरपूर विधानसभेच्या पोट निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे हे वृत्तलिहिपर्यंत 6200 मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे पंढरपूरचा विठ्ठल भाजपच्या अवताडेंना पावणार की महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना पावणार? हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली असून, राज्याचे या निकालाकडे लक्ष लागून आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार स्व. भारतनाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भारतीय जनता पक्षाने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. या शिवाय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर अवताडे हेदेखील मैदानात आहेत. शैला गोडसे या पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या असल्याने त्यांची उमेदवारी बंडखोरी मानली जात आहे. या निवडणुकीची मतमोजनी रविवारी सुरु झाली असून, सकाळपासून भाजला कौल दिसून येत आहे. पंचविसाव्या फेरीअखेर समाधान अवताडे हे 6200 मतांनी आघाडीवर होते. तर मूळ पंढरपुरातच भगीरथ भालके यांना मती मते पडलेली आहेत. विशेष बाब म्हणजे, गतनिवडणुकीत स्व. भारतनाना भालके यांना पंढरपूरने तब्बल सहा हजार मतांचा लीड दिला होता. याचा अर्थ नानांचे पुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूरचे नाकारले आहे.