धक्कादायक… ऑनलाइन फूड डिलिव्हरी बॉयचा तरुणीला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्‍न!

पुणे : ऑनलाइन फूड डिलिव्हरी बॉयचा विकृत प्रताप पुण्यात समोर आला. ३० वर्षीय तरुणीला त्याने किस करण्याचा प्रयत्न केला. १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली. मात्र त्याच वेळी तिथे तरुणीचा भाऊ आल्याने डिलिव्हरी बॉय मोटारसायकलीने फरार झाला. वाकड पोलीस ठाण्यात तरुणीने याप्रकरणाची तक्रार दिली आहे.तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा व तिच्या …
 
धक्कादायक… ऑनलाइन फूड डिलिव्हरी बॉयचा तरुणीला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्‍न!

पुणे : ऑनलाइन फूड डिलिव्हरी बॉयचा विकृत प्रताप पुण्यात समोर आला. ३० वर्षीय तरुणीला त्‍याने किस करण्याचा प्रयत्न केला. १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली. मात्र त्याच वेळी तिथे तरुणीचा भाऊ आल्याने डिलिव्हरी बॉय मोटारसायकलीने फरार झाला. वाकड पोलीस ठाण्यात तरुणीने याप्रकरणाची तक्रार दिली आहे.
तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा व तिच्या भावाचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे. स्टॉल बंद करून दोघे बहीण- भाऊ बाईकने घरी परतत होते. कुत्रे भुंकत असल्याने तिच्या भावाने बाईक थांबवली व तो कुत्र्यांना हाकलण्यासाठी त्यांचे मागे धावला. त्यावेळी तरुणी बाईकजवळ उभी होती. रस्त्याने जाणारा एक ऑनलाइन फूड डिलिव्हरी बॉय तिच्याजवळ आला व तिचा हात ओढून जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने अश्लील शेरेबाजीसुद्धा केली. मात्र तेवढ्यात तरुणीचा भाऊ परतल्याने डिलिव्हरी बॉयने तेथून पळ काढला असे तक्रारीत म्हटले आहे.