धक्कादायक ः वेबसाईटवरून माहिती घेऊन शाळकरी मुलाने केली आत्महत्या
धुळे (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः आत्महत्येबाबत मोबाइलवर सोशल नेटवर्किंग साइटवर माहिती शोधून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील 13 वर्षीय शाळकरी मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार प्रजासत्ताक दिनी समोर आला आहे. दोन महिन्यांपासून हा मुलगा जळगाव शहरातील तुकारामवाडी येथील मामाच्या घरी राहण्यासाठी आला होता. काल दुपारी त्याने साडीच्या साह्याने गळफास घेतला.
हर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर (वय 13) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. हर्षल आठवीत शिकत होता. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांपासून तो जळगाव शहरात मामा दीपक भदाणे यांच्याकडे होता. मामा कामानिमित्ताने घराबाहेर होते. हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई दोघेच घरी होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानावर गेली होत्या. त्या परतल्यानंतर हर्षलने गळफास घेतल्याचे दिसून आले. हर्षलकडे मोबाइल होता. मोबाइलमध्ये त्याने वेबसाइट ओपन करून पाहिली आहे. या वेबसाइटवर त्याने मृत्यूबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज आहे. एकुलता एकहर्षलच्या हट्टापायी आईने त्याला हप्त्यांवर काही दिवसांपूर्वीच 15 हजार रुपयांचा नवीन मोबाइल खरेदी करून दिला होता.