दिल्लीतील हिंसाचारावर अण्णा हजारे म्हणाले…

मुंबई (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपणच धुडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, हे फारच दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीतील हिंसाचाराबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहून व्यथित झाल्याचे ते म्हणाले. शेतकर्यांच्या प्रश्नांवर हजारे यांनीही 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मी चाळीस वर्षे …
 

मुंबई (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपणच धुडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, हे फारच दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीतील हिंसाचाराबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहून व्यथित झाल्याचे ते म्हणाले. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर हजारे यांनीही 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मी चाळीस वर्षे आंदोलन करीत आहे. आंदोलन म्हणजे सत्याग्रह. सत्याचा आग्रह हा शांततेच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने करावा लागतो. हिंसेमुळे आंदोलन बदनाम होते. गालबोट लागते, असे हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आज दिल्लीत जे झाले, त्यामुळे या प्रतिमेला कलंक लागला आहे. सरकारने आंदोलने रखडत ठेवू नये. दहा-बारा वेळा चर्चा आणि बैठका घेतात हे अति झाले. जन इच्छाशक्ती आहे, तर तातडीने तोडगा काढला पाहिजे. चट मंगनी पट ब्याह, असे हवे. आंदोलन रखडत गेल्याने आंदोलक शेतकरी चिडले असावेत. त्यामुळे हिंसाचाराला ते प्रवृत्त झाले असावेत. सरकार म्हणजे कोणी बाहेरची यंत्रणा नाही. तेही आपलेच लोक आहेत. त्यामुळे चर्चा करून आंदोलनावर मार्ग काढले पाहिजेत. चर्चेतून प्रश्‍न सुटतात, यावर आमचा विश्‍वास आहे. तशीच चर्चा दिल्लीतील आंदोलक आणि सरकारमध्ये झाली पाहिजे. पण ही चर्चा खूप लांबणारी नव्हे तर मर्यादित हवी. आमच्या आंदोलनातही हीच अपेक्षा ठेवतो, असे हजारे म्हणाले.