दहावीचा निकाल उद्या

मुंबई ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न घेतल्या गेलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या घोषित केला जाणार आहे. अंतर्गत मूल्यमापनात त्रुटी राहिल्याने निकाल आठवडाभर उशिरा लागेल, असे बुधवारी सांगण्यात आले होते; परंतु पूर्वघोषित तारखेच्या एक दिवस उशिरा म्हणजे १६ तारखेला आता हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यातील १६ …
 

मुंबई ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न घेतल्या गेलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या घोषित केला जाणार आहे. अंतर्गत मूल्यमापनात त्रुटी राहिल्याने निकाल आठवडाभर उशिरा लागेल, असे बुधवारी सांगण्यात आले होते; परंतु पूर्वघोषित तारखेच्या एक दिवस उशिरा म्हणजे १६ तारखेला आता हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या जाहीर केले जाणार आहे. शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा केली जाईल. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 4 हजार 441 विद्यार्थी उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे. यापैकी साधारण 15 लाख 92 हजार 418 हून अधिक विद्यार्थ्यांचे गुण कम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती आहे. कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकटपणे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंतर्गत गुण आणि मूल्यमापन संदर्भात 10 जूनपासून शाळा स्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली होती. ही कार्यवाही ३ जुलैपर्यंत पूर्ण झाली.