तुम्ही छान ड्रेस घालता, छान अन्‌ फ्रेश दिसता… महिला अधिकाऱ्याला अश्लील संदेश पाठवणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्‍हा दाखल

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एका महिला अधिकाऱ्याला तरुणाने अश्लील संदेश पाठवले. ही महिला अधिकारी कार्यालयात एकटी असल्याचे पाहून तो त्यांच्या कार्यालयात येऊन त्रास देत होता. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आल्यानंतर विशाल विजयकुमार बलदवा (रा. मारवाड गल्ली, शेवगाव) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल या महिला अधिकाऱ्यांबाबत अश्लील शेरेबाजी करीत होता. …
 

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एका महिला अधिकाऱ्याला तरुणाने अश्लील संदेश पाठवले. ही महिला अधिकारी कार्यालयात एकटी असल्याचे पाहून तो त्यांच्या कार्यालयात येऊन त्रास देत होता. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आल्यानंतर विशाल विजयकुमार बलदवा (रा. मारवाड गल्ली, शेवगाव) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल या महिला अधिकाऱ्यांबाबत अश्लील शेरेबाजी करीत होता. त्‍यांची बदनामी करीत होता. या महिला अधिकाऱ्याने विरोध केल्यानंतर त्‍याने तिच्‍याविरोधात खोट्या तक्रारी करायला सुरुवात केली. तो त्यांना फोन करून, कार्यालयात चकरा मारून ओळख वाढवण्याचा प्रयत्न करायचा. माझ्याजवळ तुमचे मन हलके करत जा, असं म्हणून तो जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. तुम्ही छान ड्रेस घालता. छान व फ्रेश दिसता, अशी शेरेबाजी करायचा. संबंधित महिला अधिकाऱ्यांनी तंबी दिली, तरी त्याचा उपद्व्याप थांबला नव्हता. त्यांच्या कामात तो ढवळाढवळ करायला लागला. उपोषणाचा इशारा देऊन त्याने फलक छापून घेतले. त्यावर विचित्र फोटो छापले. अधिकाऱ्यांची बदनामी केली. त्यांच्या पती व मुलीबद्दल वाईट बोलायचा. या मानसिक त्रासाचा उल्लेख फिर्यादीत आहे.