तरुणीला धमकी देत नेलं जंगलात, पुढं केलं असं काही की…
अमरावती: एका तरुणीला अंगावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. तिचं अपहरण करण्यात आलं. तिला जंगलात निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
राहुल बिशमदास गुलानी (राहणार रामपुरी कॅम्प) असं आरोपीचं नाव आहे. पीडित तरुणी १९ वर्षाची आहे. ती बी.कॉम.च्या अंतिम वर्षाचं शिक्षण घेते. आरोपी राहुल मुलीच्या वस्तीत राहतो. आठ- नऊ महिन्यांपासून तो या तरुणीला त्रास देत होता. फोनवर त्रास देत असल्यानं तिनं त्याचा नंबर ब्लाॅक केला. त्यानंतर राहुलनं दुसऱ्या क्रमांकावरून फोन करायला सुरुवात केली. त्यानं तिच्या व्हॉट्सप व सोशल मीडियावर मेसेज टाकले. ही तरुणी काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती. ती पत्रकार कॉलनीतून जात असताना तिला राहुलनं अडविलं. तिची दुचाकीची चावी ताब्यात घेतली. त्यानंतर त्यानं एक बाटली दाखवून सोबत चल नाही, तर ॲसिड अंगावर फेकतो, अशी धमकी दिली. त्यामुळं तरुणी घाबरली. तरुणीच्या दुचाकीवर मागं बसून त्यानं तिला दुचाकी सहकारनगरच्या दिशेनं चालविण्यास सांगितली. त्यानंतर एका निर्जनस्थळी तिच्यावर त्याने बलात्कार केला.