…तर ठाकरे सरकार कोसळेल

कंगणा रनौतचा इशारा; शिवसेनेची घेतला पुन्हा पंगा मुंबई : अभिनेत्री कंगणा रणौत हिने पुन्हा ठाकरे सरकार व शिवसेनेशी पुन्हा एकदा पंगा घेतला आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या अटकेनंतर ट्विटरवर भाष्य करताना या संपूर्ण प्रकरणाचे खापर शिवसेनेवर फोडले आहे. घटनेलाशिवसेना जबाबदार असून या घटनेमागे मोठा कट आहे. त्यामुळे त्याची सखोल चौकशी झाली तर महाराष्ट्रातील ठाकरे …
 

कंगणा रनौतचा इशारा; शिवसेनेची घेतला पुन्हा पंगा

मुंबई : अभिनेत्री कंगणा रणौत हिने पुन्हा ठाकरे सरकार व शिवसेनेशी पुन्हा एकदा पंगा घेतला आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या अटकेनंतर ट्विटरवर भाष्य करताना या संपूर्ण प्रकरणाचे खापर शिवसेनेवर फोडले आहे. घटनेलाशिवसेना जबाबदार असून या घटनेमागे मोठा कट आहे. त्यामुळे त्याची सखोल चौकशी झाली तर महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळेल, असे ट्विट कंगणाने केले आहे.
कंगणा आणि शिवसेना तसेच ठाकरे सरकारमधील वैर अनेक प्रकरणांत उफाळून आले आहे. राज्य सरकारवर सातत्याने टीका करण्यात आल्यानंतर मुंबई महापालिकेने तिच्या घराचा काही भाग बुलडोझरने पाडला होता. पण न्यायालयाने त्याप्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर अनेक प्रकरणांत कंगणा ठाकरे सरकारला लक्ष्य करत आली आहे. विशेष म्हणजे आपण असे जाहीरपणे सरकार व शिवसेनेला अंगावर घेत असल्याने सरकार गप्प बसणार नाही, याची जाणिवदेखील तिला आहे असे दिसते. कारण आपल्यावर किमान २०० गुन्हे दाखल केले जातील, असा अंदाजही तिने व्यक्त केला आहे. शिवाय तुम्ही या.. स्वागत आहे! जय हिंद! असे चॅलेंजही तिने केले आहे.