डॉ. शीतल आमटेंचा विश्वासघात कुणी केला?; पतीच्या पोस्टमुळे अनेक प्रश्न उपस्थित
मुंबई (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः मला आज खूप वेदना होत आहेत. कारण ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला आहे. तुझ्यापासून सुटका करून घेण्यात ते यशस्वी ठरलेत खरे पण आनंदवनाला ते तुझ्यापासून वेगळं करू शकणार नाहीत. कारण आनंदवनात बाबा आणि ताईंनंतरची जागा तू कधीच मिळवली आहेस…. अशी धक्कादायक पोस्ट केलीये दिवंगत डॉ. शीतल विकास आमटे यांचे पती गौतम करजगी यांनी. काल डॉ. शीतल यांचा जन्मदिवस होता, यानिमित्त त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मात्र यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, त्यांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या दिवंगत शीतल आमटे यांचा जन्मदिन 26 जानेवारीला झाला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात श्वास अडकल्याने शीतल यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. अजूनही या प्रकरणी तपास सुरू आहे. अशावेळी गौतम करजगी यांची फेसबुक पोस्ट आनंदवनातील एकूणच परिस्थितीवर भाष्य करणारी ठरली आहे.
काय आहे पोस्ट वाचा….
प्राणप्रिय शीतल (सोना),
आज तुझा 40 वा वाढदिवस! तू खूप दूर निघून गेली असलीस तरी अजूनही तू माझ्या जवळच आहेस, तुला मिठीत घ्यावसं वाटतंय पण प्रिये… तुला अशाप्रकारे येथून शुभेच्छा द्याव्या लागतील याची मी कधीच कल्पना केली नव्हती. तू माझ्यासोबत नाहीस, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीय. आपण चाळीशीचे झाल्यानंतर पुढचं जीवन कसं व्यतीत करायचं याबाबत अनेक योजना आपण आखल्या होत्या. त्यातच आयुष्यात वर्षांची भर घालण्यापेक्षा वर्षांमध्ये आयुष्याची भर घालत जाणं जास्त महत्त्वाचं आहे, असं तुझं नेहमी सांगणं असायचं. शीतल, तू माझ्यासाठी चमकता तारा राहिली आहेस आणि कायमच राहणार आहेस. तू मला आनंदवनाची ओळख करून दिलीस आणि त्याचवेळी अर्थपूर्ण जीवनाचं मोल काय असतं याची शिकवणही तू मला दिलीस. तू एक उत्तम लेक, मित्र, मार्गदर्शक, आई आणि पत्नी होतीस. बाबा आणि ताई यांनी जपलेल्या मूल्यांची तू सच्ची अनुयायी होतीस. मला आज खूप वेदना होत आहेत कारण ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला आहे. तुझ्यापासून सुटका करून घेण्यात ते यशस्वी ठरलेत खरे पण आनंदवनाला ते तुझ्यापासून वेगळं करू शकणार नाहीत. कारण आनंदवनात बाबा आणि ताईंनंतरची जागा तू कधीच मिळवली आहेस. आज तुझ्या वाढदिवशी मी तुला वचन देतो की, तुला जसं अपेक्षित होतं तसंच मी शर्विलचं संगोपन करेन. तू तुझ्या आयुष्यात जी मूल्ये जपली आणि जगलीस ती सारी मूल्ये शर्विलमध्ये उतरतील, याची काळजी मी घेईन. मला खात्री आहे की, तू अशा कुटुंबात पुनर्जन्म घेशील, ज्यांना आपल्या लेकीची काळजी आहे. जी माया आणि प्रेम आईवडिलांकडून त्यांच्या लेकीला मिळणं आवश्यक असतं ते तुला तिथे निश्चितच मिळेल. मी नेहमीच माझ्या चमकत्या तार्याची वाट पाहत राहीनतुझाच गौतम
Dearest Sheetal (Sona),
Today is your 40th Birthday!You are so far and yet so near,I want to hug you but oh dear,Never had I imagined that I would wish you from here.I still can’t fathom that you are not with me. We had made so many plans of how we would like to lead our lives after we turn 40. You always said that it is important to add life to the years than years to the life.Sheetal, you have been my shining star and will always remain so. You introduced me to Anandwan and taught me the value of ‘Arthpoorna Jeevan’ (life with purpose). You were an excellent daughter, friend, mentor, mother and wife. You were the true follower of Baba and Tai’s values. It pains me a lot as those who you cared about betrayed you and also me. They were successful in getting rid of you but they could never remove Anandwan from you. For you have earned a place next to Baba and Tai.On your birthday today I promise you I will groom Sharvil the way you wanted, inculcating in him all the values that you cherished and lived by. I sincerely hope you take rebirth today in a family that cares for their daughter and get all the love and warmth that you so desperately needed from your parents.I will always be waiting for my shining star.
Yours Gautam