जिल्ह्याच्या सीमेवर लाइन टॉवरला फास घेऊन युवकाची आत्महत्या

वरूड बुद्रूक (युवराज बोर्डे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वरूड बुद्रूक (ता. जाफराबाद) येथील शिवाजी सुदाम काळे (35) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, 13 जानेवारीला सायंकाळी समोर आली आहे. शिवाजी काळे काल दुपारपासून घरातून गायब होते. सध्या गावात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने घरातील सदस्यांना वाटले की गावात असेल. मात्र आज …
 

वरूड बुद्रूक (युवराज बोर्डे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वरूड बुद्रूक (ता. जाफराबाद) येथील शिवाजी सुदाम काळे (35) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, 13 जानेवारीला सायंकाळी समोर आली आहे. शिवाजी काळे काल दुपारपासून घरातून गायब होते. सध्या गावात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने घरातील सदस्यांना वाटले की गावात असेल. मात्र आज सायंकाळी त्यांच्या आत्महत्येची बातमीच त्यांना कळली. गावाबाहेरील लाईन टॉवरवर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री. मोरे व सहकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.