जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वरूड बुद्रूकमध्ये सत्ता परिवर्तन!

वरुड बुद्रूक (युवराज बोर्डे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या सीमेवर परंतु जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक गावात सत्ता परिवर्तन घडले आहे. गव्हाड कुटुंबाचे वर्चस्व ग्रामपंचायतीवर होते. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात होती. मात्र यावेळी ग्रामस्थांनी सत्ता परिवर्तन घडवले असून, त्यांच्या शिवशाही पॅनलला तेरा जागांपैकी केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व …
 

वरुड बुद्रूक (युवराज बोर्डे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या सीमेवर परंतु जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक गावात सत्ता परिवर्तन घडले आहे. गव्हाड कुटुंबाचे वर्चस्व ग्रामपंचायतीवर होते. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात होती. मात्र यावेळी ग्रामस्थांनी सत्ता परिवर्तन घडवले असून, त्यांच्या शिवशाही पॅनलला तेरा जागांपैकी केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पुरस्कृत पॅनलला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत.