खरं बोललो तर माझे मुंडके उडवतील!; ‘सीरम’च्या अदर पुनावाला यांनी व्यक्त केली भीती

भारत सोडून सहकुटुंब लंडनला पळाले पुणे : जगातील सर्वात मोठ्या लसनिर्मिती संस्थेचे सीईओ अदर पुनावाला यांनी भारत सोडून लंडनचा आश्रय घेतला आहे. आपल्याला राजकारणातील मोठ्या लोकांकडून धमक्या येत होत्या. खरं बोललो तर ते आपले मुंडके उडवतील, अशी भीती व्यक्त करत, आपण भारत सोडल्याचे सीरम इन्सिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला यांनी सांगितले. कोविड -19 …
 

भारत सोडून सहकुटुंब लंडनला पळाले

पुणे : जगातील सर्वात मोठ्या लसनिर्मिती संस्थेचे सीईओ अदर पुनावाला यांनी भारत सोडून लंडनचा आश्रय घेतला आहे. आपल्याला राजकारणातील मोठ्या लोकांकडून धमक्या येत होत्या. खरं बोललो तर ते आपले मुंडके उडवतील, अशी भीती व्यक्त करत, आपण भारत सोडल्याचे सीरम इन्सिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला यांनी सांगितले.

कोविड -19 ला प्रतिबंधक ठरणार्‍या कोविशिल्ड या इंजेक्शनच्या पुरवठ्यासंदर्भात आपल्यावर फार मोठा दबाव होता. कोविशिल्ड लस मागणार्‍या मोठ्या नेत्यांनी आपल्याशी फोनवर बोलताना धमकीची भाषा वापरली. त्यामुळे जीवाला धोका असल्याने आपण भारत सोडून सहकुटुंब लंडनला आलो आहोत. आता लवकर भारतात येण्याची आपली इच्छा नाही. राष्ट्रहित म्हणून माझ्या खांद्यावर काही जबाबदारी आहे. परंतु, सर्वांच्या मागण्यांची पूर्तता मी एकटा करू शकत नाही. परंतु, ज्यांचे मी ऐकत नाही, त्या लोकांपासून माझ्या जीवितास धोका असल्याने आपण 28 एप्रिलरोजी गुपचूप लंडनला येऊन ब्रिटीश सरकारला शरण आलो आहोत.

आता अदर पुनावाला यांना देशातील कोणत्या मोठ्या लोकांनी धमकी दिली, याचा शोध घेण्याची गरज आहे. अदर पुनावाला यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी घरगुती संबंध असून, अदर यांचे वडिल शरद पवार यांचे वर्गमित्र आहेत. तरीही त्यांना धमक्या येणे ही धक्कादायक बाब मानली जात आहे.