किती ही विकृती… स्वतःकडून मूल होत नाही म्‍हणून मित्राला पत्‍नीवर लैंगिक अत्‍याचार करायला सांगितले!; स्वतः पाहत बसला!!

अहमदनगर : पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात समोर आली आहे. आपल्याकडून पत्नी गर्भवती राहत नाही म्हणून पतीनेच त्याच्या मित्राला आपल्या पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवायला सांगितले. डोळ्यांदेखत त्याने मित्राला पत्नीवर लैंगिक अत्याचार करायला लावला. पीडित विवाहितेने नातेवाइकांच्या मदतीने पोलीस ठाणे गाठून या प्रकरणात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी या विकृत पतीसह त्याच्या मित्रालाही अटक केली …
 
किती ही विकृती… स्वतःकडून मूल होत नाही म्‍हणून मित्राला पत्‍नीवर लैंगिक अत्‍याचार करायला सांगितले!; स्वतः पाहत बसला!!

अहमदनगर : पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात समोर आली आहे. आपल्याकडून पत्‍नी गर्भवती राहत नाही म्‍हणून पतीनेच त्‍याच्‍या मित्राला आपल्या पत्‍नीसोबत शरीरसंबंध ठेवायला सांगितले. डोळ्यांदेखत त्‍याने मित्राला पत्‍नीवर लैंगिक अत्‍याचार करायला लावला. पीडित विवाहितेने नातेवाइकांच्‍या मदतीने पोलीस ठाणे गाठून या प्रकरणात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी या विकृत पतीसह त्‍याच्‍या मित्रालाही अटक केली आहे.

पीडित २२ वर्षीय तरुणीचे २०२० च्या लॉकडाऊनमध्ये पाथर्डी तालुक्यातील तरुणाशी लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस सुखाचा संसार झाल्यानंतर पती- पत्नीत घरगुती वाद झाले. त्यानंतर पीडिता माहेरी जाऊन राहिली. काही दिवसांपूर्वी ती सासरच्या गावात राहणाऱ्या तिच्या आजोबांकडे राहायला आली. त्यावेळी तिचा पती तिथे गेला व झाले गेले विसरून नांदायला चल, असे तिला म्हणाला. नवऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवून ती सासरी गेली. २२ सप्टेंबरच्या रात्री तिचा पती एका मित्राला सोबत घेऊन घरी आला. दोघांनी तिच्या खोलीत येताच दरवाजा बंद केला. मला मूल पाहिजे म्हणून तू माझ्या या मित्राशी संबंध ठेव, असे पती तिला म्हणाला.

हे अनैतिक असल्याचे सांगत तिने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिला पकडून जबरदस्ती तिच्या तोंडात दोन गोळ्या टाकल्या. त्यामुळे ती चक्कर येऊन पडली. पतीच्या मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पतीनेही अत्याचार केला. काम झाल्यानंतर मित्र निघून गेला. ही गोष्ट कोणाला सांगू नको. माझ्याच्याने जमणार नाही. आपल्याला मूल हवे असेल तर माझ्या मित्राशी संबंध ठेवावेच लागतील, असे पतीने पत्नीला धमकावले. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तिचा पती मित्राला घेऊन आला. त्यादिवशीही मित्राने तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले. २४ सप्टेंबर रोजी दुपारी पीडितेने शेजारच्या महिलेच्या फोनवरून ही बाब माहेरी कळवली. पीडितेचा मामा तिच्याकडे आला. दोघांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या काही तासांत आरोपींना अटक केली.