कंत्राटदाराच्या पत्नीवर ब्लॅकमेल करून अत्याचार
अमरावती : सोशल मीडियातून झालेल्या ओळखी या फसवणुकीचे कारण ठरत आहेत. त्यातही महिला व तरुणींची त्यात जास्त फसवणूक होत असून प्रसंगी त्यांचे शारीरिक शोषण केले जात आहे. नागपूरमधील दोन मुलींची आई असलेल्या एका विवाहित महिलेचे अशाच प्रकारे शारीरिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नागपूरमधील एका कंत्राटदाराच्या पत्नीचे अमरावती येथील नितीन थोरात या ३० वर्षीय तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. ही महिला दोन मुलींची माता आहे. तरीही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सोशल मीडियातील भेटी, संभाषणातून भागेना म्हणून त्यांनी एकमेकांना भेटण्याचे ठरवले.सहा महिन्यांपूर्वी नितीन थोरात हा अमरावती येथून नागपूरला गेला.तेथे सीताबर्डी भागातील एका लॉजवर ही महिला आणि नितीन थोरात रात्रभर एकटे राहिले. तेथे त्यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतरही ते दोघे एकमेकांना भेटत राहिले. गेल्या आठवड्यात नितीने त्या महिलेला आपण लग्न करू म्हणून आग्रह धरला.पण महिेने नकार देताच. सोशल मीडियात तुझी बदनामी करतो, तुझे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करतो. तुझ्या मुलीला मारून टाकतो, असे म्हणून धमकावले व तिला अमरावतीला बोलावून घेतले. तेथे एका खोलीत डांबून ठेवले व महिलेवर अत्याचार केले. त्याला कंटाळून महिलेने पतीला फोन करून आपबिती सांगितली. पतीने पोलिसांची मदत घेऊन अमरावती गाठून आरोपीला बेड्या ठोकल्या व आपल्या पत्नीची सुटका केली.