ऑक्सिजनची नळी गुंडाळून कोरोनाबाधित वृद्धाची रुग्णालयातच आत्महत्या
नागपूर शहरातील कोविड सेंटरमधील खळबळजनक घटना
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आज विचित्र आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. नागपूर शहरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एका कोविड रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष वॉर्डात एका ८१ वृद्धाने ऑक्सिजनसाठी लावण्यात आलेल्या प्लास्टिकच्या वायर गळ्याभोवती गुंडाळून बाथरूममध्ये आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु आम्ही त्या कारणाची तसेच ही घटना कशी घडली याची चौकशी करत आहोत, असे जीएमसी वैद्यकीय महाविद्यालाचे पर्यवेक्षक डॉ. कांचन वानखेडे यांनी सांगितले.
नागपूर येथे ट्रामा केअर सेंटरमध्ये कोविड रुग्णांसाठी सेंटर सुरू करण्यात आले आहे.पण शहरात तसेच या केंद्रावर रुग्णसंख्या वाढत असल्याने गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना परत पाठविण्यात येत होते.त्यानंतर रुग्णालयाच्या बेसमेंटमध्येही रुग्ण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठवड्यापासून बेसमेंटमध्येही ९० रुग्ण दाखल होते. गजभिये नावाच्या ८१ वर्षीय रुग्णावर तेथेच उपचार सुरू होते. त्यांनी सोमवारी सायंकाळी बाथरूममध्ये गेल्यानंतर ऑक्सिजनची नळी एक्झॉस्ट फॅनला बांधून त्याने गळफास घेतला. आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे. काही वेळानंतर सफाई कर्मचारी तेथे गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.कोविड वॉर्डात त्यांचे कुणीही नातेवाईक नसल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.