…उद्या तुमची डोकी फुटली तर रडत बसू नका!-संजय राऊत

संजय राऊत यांचा सज्जड इशारा; स्वत: बेळगावला जाण्याचे संकेतमुंबई : कोल्हापूर येथील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना कर्नाटकात बेळगाव येथे झालेल्या मारहाणीमुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. मराठी बांधवांना होणारी मारहाण व अत्याचारांना उद्या शिवसैनिकांनी त्याच भाषेत उत्तर दिले आणि तुमची डोकी फुटली तर दिल्लीला केंद्र सरकारकडे जाऊन रडू नका.बेळगावमध्ये मराठी माणसांवर अत्याचार होत …
 

संजय राऊत यांचा सज्जड इशारा; स्वत: बेळगावला जाण्याचे संकेत
मुंबई :
कोल्हापूर येथील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना कर्नाटकात बेळगाव येथे झालेल्या मारहाणीमुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. मराठी बांधवांना होणारी मारहाण व अत्याचारांना उद्या शिवसैनिकांनी त्याच भाषेत उत्तर दिले आणि तुमची डोकी फुटली तर दिल्लीला केंद्र सरकारकडे जाऊन रडू नका.बेळगावमध्ये मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. त्याची दखल कुणी घेणार नसेल तर शिवसेनेला पूर्ण ताकदीनिशी त्यासाठी उतरावे लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
कानडींकडून मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी.केंद्राला प. बंगालमधील हिंसाचार दिसतो. मग बेळगावमधील का नाही? तुम्ही यात हस्तक्षेप करणार नसाल तर महाराष्ट्राला पूर्ण ताकदीनिशी मराठी माणसांच्या समर्थनासाठी मैदानात उतरावे लागेल. त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली तर शिवसेनेला जबाबदार धरू नये. डोकी फुटली तर रडत बसू नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. लवकरच आपण स्वत: बेळगावला जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.