आज टिचरनी काय शिकवलं… चिमुकलीनं जे सांगितलं ते ऐकून आईने थेट तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले होते! ; शिक्षकाला एक वर्षाची शिक्षा
मुंबई : आज टिचरनी काय शिकवलं, हे आईने कौतुकाने विचारलं. पण चिमुकलीने पुढे जे सांगितलं ते ऐकून तिची आई हादरून गेली. तातडीने पतीला बोलावून घेत तिने चिमुकलीसह पोलीस ठाणे गाठले. शिक्षकाने तिला अश्लील व्हिडिओ दाखवून हस्तमैथून केल्याचा आरोप या दाम्पत्याने पोलिसांत केला होता. मुंबईच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात शिक्षकाला दोषी ठरवत १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. घटना घडली तेव्हा आरोपी शिक्षकाचे वय ३० तर चिमुरडी अवघी ५ वर्षांची होती.
३० ऑगस्ट २०१६ ला ही घटना घडली होती. तिचे काका अरबी शिकण्यासाठी तिला शिक्षकाकडे सोडून गेले होते. त्यानंतर संध्याकाळी तिचे वडील तिला घेऊन घरी आले. तिच्या आईने तिला कौतुकाने आज टिचरनी काय काय शिकवले हे विचारले. तेव्हा चिमुकलीने जे दाखवलं ते धक्कादायक होतं. याप्रकरणात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तातडीने शिक्षकाला अटक केली होती. त्याचा फोन जप्त केला होता. फी भरत नसल्याने फसविण्याचा कट रचल्याचा आराेप शिक्षकाने केला. मात्र न्यायालयाने तो फेटाळला. केवळ फीसाठी असा आरोप पालक करणे शक्य नाही, असे सरकारी वकील म्हणाले. मुलीला दाखवलेले व्हिडिओ आणि फोटो अश्लील असल्याचेही त्यांनी सांगितले.