असेही प्राणीप्रेम… कोंबड्याची बँड लावून अंत्ययात्रा!

नांदेड : शेतकऱ्यांच्या जीवनात शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हैस, बैल, बोकड, कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्याइतकेच कोंबड्यांनाही तितकेच स्थान असते. हे प्राणी न राहता त्याच्या कुटुंबातले घटक बनून जातात. शेतकरी त्यांच्यावर आपल्या अपत्याइतकेच प्रेम करतो. त्यातील एखादा प्राणी घरात सर्वांचाच अतिशय लाडका होऊन जातो. अशा लाडक्या प्राण्याचे निधन झाले, की तो दुःखी होतो. जवळच्यावर जसे अंत्यसंस्कार …
 

नांदेड : शेतकऱ्यांच्या जीवनात शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हैस, बैल, बोकड, कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्याइतकेच कोंबड्यांनाही तितकेच स्थान असते. हे प्राणी न राहता त्याच्या कुटुंबातले घटक बनून जातात. शेतकरी त्यांच्यावर आपल्या अपत्याइतकेच प्रेम करतो. त्यातील एखादा प्राणी घरात सर्वांचाच अतिशय लाडका होऊन जातो. अशा लाडक्या प्राण्याचे निधन झाले, की तो दुःखी होतो. जवळच्यावर जसे अंत्यसंस्कार केले जातात, तसेच अंत्यसंस्कार मग त्या प्राण्यावरही केले जातात. असे भाग्य नांदेडमध्ये एका राजा नावाच्या कोंबड्याच्या वाट्याला आले.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सावरमाळ येथील शेतकरी शंकर कोकले यांचं त्यांच्या राजा या कोंबड्यावर जीवापाड प्रेम होतं. त्याला मांजरीने चावा घेतला. त्यात हा राजा जखमी झाला. कोकले यांनी त्यावर उपचार केले; परंतु कोंबडा वाचू शकला नाही. कोकले यांनी त्याला मोठ्या दुःखद अंतकरणाने निरोप दिला. त्यापूर्वी त्याची बँडच्या तालावर अंत्ययात्रा काढली. त्याच्यासाठी जमिनीत खड्डा खणला. दफनविधी जसा करतात, तसा विधी राजाचा केला. त्यात गावकरीही सहभागी झाले होते. कोकले यांना दहा वर्षे राजा नावाच्या कोंबड्यानं साथ दिली. लोक त्याला भजे, मुरमुरे खायला देत. तो सर्वांचा लाडका झाला होता. या राजाच्या अचानक जाण्यानं केवळ कोकले यांनाच नाही, तर गावकऱ्यांनाही दुखः झालं. त्यामुळे गावकरीही राजाच्या अंत्ययात्रेत दुःखद अंतकरणानं सहभागी झाले होते. सध्या कोरोनामुळे मुलगा वडीलांवर अंत्यसंस्कार करण्याचं टाळतो. इथं मात्र राजाच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी झाली होती.