अमानुष ः तीन महिन्यांच्या बालिकेवर तृतीयपंथीयाकडून बलात्कार

मुंबई ः घरात मुलगी होऊनही बक्षीस दिले नाही, साडीचोळी दिली नाही, म्हणून तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आलेल्या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागले आहे. हत्येपूर्वी तृतीयपंथीयांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. कुणालाही घरात अपत्य झाले, तर तृतीयपंथीयांना बक्षिसी दिली जाते. साडी दिली जाते. ही प्रथा केवळ ग्रामीण भागातच …
 

मुंबई ः घरात मुलगी होऊनही बक्षीस दिले नाही, साडीचोळी दिली नाही, म्हणून तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आलेल्या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागले आहे. हत्येपूर्वी तृतीयपंथीयांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

कुणालाही घरात अपत्य झाले, तर तृतीयपंथीयांना बक्षिसी दिली जाते. साडी दिली जाते. ही प्रथा केवळ ग्रामीण भागातच आहे, असे नाही, तर मुंबईसारख्या शहरांत आहे. या प्रथेमुळे तृतीयपंथीयांचे फावते. ते कुठल्याही थराला जातात. अशाच एका गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आली. या कुटुंबाकडे जाऊन तृतीयपंथीयांनी ११०० रुपये, साडीची मागणी केली. या गरीब कुटुंबाला ते शक्य नव्हते. तृतीयपंथीयांनी शिव्याशाप देऊन तिथून काढता पाय घेतला; परंतु मध्यरात्रीनंतर येऊन त्या तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण केले. तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा मृतदेह खाडीशेजारी पुरला. आता या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला. चार दिवसानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. कफ परेड पोलिसांनी एक तृतीयपंथी आणि त्याच्या साथीदार मित्राला अटक केली आहे. तृतीयपंथी कन्हैया चौगुले आणि त्याचा साथीदार सोनू काळे अशी त्यांची नावे आहेत.