अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद अपघातानेच मिळाले

संजय राऊत यांनी काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीलाही घेतले अंगावरमुंबई : शिवसेनेचे खासदार, नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून युपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवारांनी करावे, असे म्हणून काँग्रेस पक्षाला डिवचत आहेत. त्याची ही सूचना फेटाळून लावत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी ते शरद पवारांचे प्रवक्ते आहेत? हे आम्ही आता मुख्यमंत्र्यांनाच विचारणार आहोत, असे म्हटले होते. राऊत …
 

संजय राऊत यांनी काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीलाही घेतले अंगावर
मुंबई
: शिवसेनेचे खासदार, नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून युपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवारांनी करावे, असे म्हणून काँग्रेस पक्षाला डिवचत आहेत. त्याची ही सूचना फेटाळून लावत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी ते शरद पवारांचे प्रवक्ते आहेत? हे आम्ही आता मुख्यमंत्र्यांनाच विचारणार आहोत, असे म्हटले होते. राऊत यांच्या या विधानाने काँग्रेस चांगलीच डिवचली गेली होती. पण आता राऊत यांनी सामना या दैनिकातील ‘रोखठोक‘ या त्यांच्या साप्ताहिक सदरात काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसलाही अंगावर घेतले आहे.
विशेषत: राऊत यांनी चालू घडामोडींवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनिल देशमुख हे अपघातानेच गृहमंत्री झाले आहेत.जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर शरद पवारांनी हे पद देशमुख यांच्या गळ्यात घातले. त्यांना हे पद अपघातानेच मिळाले, असे राऊत यांनी म्हटले आहे. सचिन वाझे नावाचा एक साधा सहाय्यक पोलीस अधीक्षक मोठमोठ्या रकमांची वसुली करतो आणि गृहमंत्री देशमुखांना त्याची गंधवार्ताही नसावी हे आश्चर्यकारक आहे

.हे एवढे सगळे घडत असताना देशमुख काय करत होते? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे. वाझेला इतके मोठे अधिकार कुणी दिले? हा संशोधनाचा विषय व्हायला हवा, असे राऊत म्हणाले. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी प्रारंंभी कुणीही पुढे आले नाहीऋ कारण सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल‘ नावाची काहीच योजना नव्हती, असेही राऊत यांनी लेखात नमूद केले आहे. देशमुख यांच्यावरील वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून किंवा अनिल देशमुख यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु यामुळे महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष सेनेवर नाराज होणार आहेत. शिवाय विरोधी पक्ष भाजपलाही आक्रमक होण्याची संधी मिळणार आहे.