अतिउत्साहात व्हिडिओ व्हायरल केला अन् फुटले प्रेमविवाहाचे बिंग

अल्पवयीन मुलीशी केला होता ऑटोरिक्षातच विवाह अमरावती : टीनएजर्स मुले, मुली उत्साहाच्या भरात काय करतील ते काही सांगता येत नाही. विदर्भातील अमरावती शहरात एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे.येथे एका प्रेमी तरुणाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. इतकेच नव्हे तर ऑटोरीक्षात बसून एकमेकांच्या गळ्यात हार घालून साताजन्माची सोबत करण्याची स्वप्ने रंगवत …
 

अल्पवयीन मुलीशी केला होता ऑटोरिक्षातच विवाह

अमरावती : टीनएजर्स मुले, मुली उत्साहाच्या भरात काय करतील ते काही सांगता येत नाही. विदर्भातील अमरावती शहरात एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे.येथे एका प्रेमी तरुणाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. इतकेच नव्हे तर ऑटोरीक्षात बसून एकमेकांच्या गळ्यात हार घालून साताजन्माची सोबत करण्याची स्वप्ने रंगवत लग्नही केले.शिवाय मंगळसूत्र बांधणे, भांगेत कुंकू भरणे असे रितसर पारंपरिक विधीही उरकले. पण सदर मुलगी अजून सज्ञान झाली नव्हती.तिचे वय अवघे १७ वर्षांचे असल्याने पुढील अडचणीची जाणिव होऊन दोघेही आपापल्या आई- वडिलांच्या घरीच राहू लागले. जणू काय काही झालेच नाही, असे भासविण्याचा त्यांचा प्रयत्न काही काळ यशस्वीदेखील ठरला. पण न राहवल्याने अतिउत्साही प्रेमी तरुणाने ऑटो रिक्षातील विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला आणि त्यांच्या लग्नाचे बिंग फुटले. मुलीच्याघरी हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून सदर तरुणाविरुद्ध,ऑटोचालकासह मुलाच्या तीन मित्रांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे यात ऑटोचालकास इतर पाचजणही अडकले आहेत पोलीस त्यांच्याविरोधात कारवाईसाठी नियमांची पुस्तके चाळत बसले आहेत.