जिल्ह्याच्या भूमिपुत्राचा आवाज शेतीप्रश्नावर गाजणार! आज, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव लोकसभेत "या" मुद्द्यावर बोलणार! शिवसेनेच्या वतीने करणार भाषण.....

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या वतीने २०२५–२६ शेतीवरील अनुदान मागणी प्रस्तावावर आज शिवसेनेच्या वतीने केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव भाषण करणार आहेत.
 सध्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज कृषी मंत्रालयाच्या वतीने २०२५–२६ च्या अनुदान मागणी प्रस्तावावर चर्चा होणार आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री आता बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रतापराव जाधव हे भाषण करणार आहेत. शेती प्रश्नांची जाण असलेल्या ना .प्रतापराव जाधवांचे हे भाषण दुपारी ३ ते ६ या वेळेत लोकसभा टीव्ही वर लाइव्ह दाखवण्यात येईल..