State News : लग्न दुसरीशी लग्न केले तरी पहिलीला म्हणतो, “तुम सिर्फ मेरी हो..!’; डॉक्टर तरुणीवर हातपाय बांधून लैंगिक अत्याचार!!
जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर दुसऱ्याच तरुणीशी लग्न केले. लग्नानंतरही पहिलीशी असलेले संबंध कायम ठेवण्यासाठी ब्लॅकमेल केले. जळगावमध्ये मैत्रिणीच्या खोलीवर बोलावून हातपाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घटनेनंतर पीडित तरुणीने जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संपत मल्हाड (३०) नावाच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१६ मध्ये उस्मानाबाद येथे ती प्राध्यापक म्हणून काम करत होती तेव्हा विद्यार्थ्यांना सांगली जिल्ह्यातील मिरज येथे घेऊन गेली होती. मिरज येथे एक महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत तिची संपतशी ओळख झाली. यातून लग्नाचे आमिष दाखवून संपतने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. २०१७ या वर्षात तिला पुण्यातील भारती विद्यापीठात नोकरी मिळाली.
तिथेही वारंवार संपतने तिचा उपभोग घेतला. यातून ती गर्भवती राहिल्याने पाळधी येथील रुग्णालयात गर्भपात केला. त्यानंतरही तिला वारंवार लॉजवर नेऊन त्याने लैंगिक संबंध ठेवले. मात्र २०२० मध्ये लॉकडाऊन काळात संपतने दुसऱ्याच तरुणीशी लग्न केले. त्यामुळे पीडित तरुणीने त्याच्यासोबत संपर्क कमी केला. मात्र संपत व्हिडिओ कॉल करून तिला ब्लॅकमेल करू लागला. संपतने औरंगाबादला बोलावून पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ६ सप्टेंबर २०२० रोजी जळगाव येथे मैत्रिणीच्या खोलीवर तरुणीला बोलावले. तिथे हात पाय बांधून तिच्यावर संपतने बळजबरी लैंगिक अत्याचार केला. तू फक्त माझी आहे. दुसऱ्याची होऊ शकत नाही, असे संपत तिला म्हणाला, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संपत मल्हाड (३०, रा. दरबीडची, ता. जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.