State News : मुंबई तुंबली!; मॉन्सूनची जोरदार सलामी!
मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः मॉन्सूनने जोरदार सलामी दिल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबल्याचे चित्र दिसून आले. काही तासांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, वाहनांना वाट काढणेही अवघड झाले आहे. रेल्वे रूळही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य आणि हार्बर लाइनवरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. केवळ …
Jun 9, 2021, 13:17 IST
मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः मॉन्सूनने जोरदार सलामी दिल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबल्याचे चित्र दिसून आले. काही तासांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, वाहनांना वाट काढणेही अवघड झाले आहे. रेल्वे रूळही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य आणि हार्बर लाइनवरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातही जोरदार सरी कोसळत आहेत. उपनगरे असलेल्या मुलूंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूरमध्येही पाऊस कोसळत आहे.