STATE NEWS : भांगेत कुंकू भरून म्हणाला, आजपासून मी तुझा नवरा! २५ वर्षीय तरुणाचे ३५ वर्षीय विधवेसोबत गैरकृत्य
नागपूर : ३५ वर्षीय विधवेच्या असाह्यतेचा फायदा घेत २५ वर्षीय तरुणाने तिच्यासोबत गैरकृत्य केले. लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. मात्र लग्नास टाळाटाळ केल्याने विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली. नागपुरातील सदर पोलिसांनी तक्रारीवरून निखिल सुप्रबुद्ध शेंडे (२५, रा. सदर, नागपूर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित विधवेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१४ मध्ये तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर ती लहान मुलासह एकटीच राहत होती. त्या दरम्यान निखिलने तिच्याशी ओळख वाढवली. मदत करण्याचे आश्वासन दिले. नंतर लग्नाचे आमिष दाखवून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. एक दिवस तिच्या भांगेत कुंकू भरून “आजपासून मी तुझा नवरा”..असे म्हणून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तो सतत संबंध ठेवू लागला. नंतर विधवेने कोर्ट मॅरेज करण्याची मागणी केली असता तो टाळाटाळ करू लागला व बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. शेवटी महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत प्रकरणाची तक्रार दिली.