State News : पत्‍नीला परतीचे तिकिट नाकारल्याने संगणक अभियंत्याने बघा काय केले… सर्वांचे होश उडवले!

पुणे : बदला घेण्यासाठी, सूड उगविण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. ८ ऑक्टोबरला पुण्यातील लोहगाव विमानतळावर असाच विचित्र प्रकार घडला. पत्नीला परतीचे तिकिट मिळाले नाही म्हणून एका कॉम्प्युटर इंजिनिअरने विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तपास यंत्रणांनी शोध घेतला असता ही अफवा असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्या इंजिनिअरला अटक केली. …
 
State News : पत्‍नीला परतीचे तिकिट नाकारल्याने संगणक अभियंत्याने बघा काय केले… सर्वांचे होश उडवले!

पुणे : बदला घेण्यासाठी, सूड उगविण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. ८ ऑक्‍टोबरला पुण्यातील लोहगाव विमानतळावर असाच विचित्र प्रकार घडला. पत्नीला परतीचे तिकिट मिळाले नाही म्हणून एका कॉम्प्युटर इंजिनिअरने विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तपास यंत्रणांनी शोध घेतला असता ही अफवा असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्या इंजिनिअरला अटक केली.

ऋषिकेश सावंत (२८, रा. बाणेर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या इंजिनिअरचे नाव आहे. तो एका आयटी कंपनीत इंजिनिअर आहे. तो त्याच्या पत्नीला सोडण्यासाठी लोहगाव विमानतळावर गेला होता. १६ ऑक्टोबरला त्याच्या पत्नीचे परतीचे तिकिट होते. मात्र १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावपट्टीच्या कामामुळे लोहगाव विमानतळावरून देशातील तसेच प्रदेशातील उड्डाणे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे १६ ऑक्टोबरचे तिकिट रद्द करून १५ ऑक्टोबरला तिकिट द्या, अशी मागणी त्याने विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली.

मात्र तिकिट उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे ऋषिकेशने विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. या अफवेमुळे रांचीला जाणाऱ्या विमानाने तब्बल तीन तास उशिराने उड्डाण केले. ऋषिकेशला पोलिसांनी अटक केल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतर पत्नीला परतीचे तिकीट नाकारल्याने आपण हा गोंधळ घातल्याची त्याने कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनीही डोक्यावर हात ठेवला.