State News : धक्कादायक..! बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

नागपूर : बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर चार तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना नागपूर शहरात समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना समोर आली आहे. पीडित १८ वर्षीय तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली होती. माधवनगर भागातील रस्त्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास ती बॉयफ्रेंडसोबत बोलत उभी होती. तिथे ४ तरुण आले. …
 
State News : धक्कादायक..! बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

नागपूर : बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर चार तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना नागपूर शहरात समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना समोर आली आहे.

पीडित १८ वर्षीय तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली होती. माधवनगर भागातील रस्त्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास ती बॉयफ्रेंडसोबत बोलत उभी होती. तिथे ४ तरुण आले. त्यांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला शेजारील शिवारात नेऊन तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपी तरुण पळून गेले. तरुणीने रात्रीच कसेबसे पोलीस स्टेशन गाठले. तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून अन्य तिघे आरोपी अद्याप फरारी आहेत.